एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, जनरल ॲन्युइटी प्रॉडक्ट.
एसबीआय लाइफ - स्मार्ट अॅन्युईटी प्लस द्वारा पुरवल्या जाणाऱ्या नियमित गॅरंटीड उत्पन्नाने तणाव-मुक्त सेवानिवृत्तीचा आनंद घ्या. हा एक अॅन्युईटी प्लॅन आहे जो तात्काळ आणि विलंबाने असे दोन्ही अॅन्युईटी पर्याय, तसेच जॉइंट लाइफ पर्याय देतो, जे तुम्हाला देतात निवांत निवृत्त जीवनाची खात्री, तसेच तुमच्या जीवलगांना आर्थिक सुरक्षा.
ठळक वैशिष्ट्ये :
वयाच्या 30व्या वर्षांपासून गॅरंटीड लाइफटाइम नियमित उत्पन्न उपलब्ध^
अॅन्युइटी पर्यायांच्या विशाल श्रेणीमधून निवडण्याचे स्वातंत्र्य
मोठ्या प्रीमियमसाठी अधिक अॅन्युइटी पेआउट्सचा लाभ
^प्रॉडक्ट कन्व्हर्शन, एनपीएस कॉर्पसकडून आणि क्यूआरओपीएस कॉर्पसकडून खरेदी व्यतिरिक्त तात्काळ अॅन्युईटी पर्यायांसाठीच फक्त लागू.
अॅन्युइटीज् भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्याच्या अनुसार करपात्र आहेत, जे वेळोवेळी बदलू शकतात. तपशीलांसाठी कृपया तुमच्या टॅक्स अॅडवायजरचा सल्ला घ्या. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा.
अॅन्युईटी पर्यायांच्या विशाल श्रेणीमधून निवडण्याचे स्वातंत्र्य.
गॅरंटीड लाइफलाँग रेग्युलर उत्पन्नाचा लाभ घ्या.
तात्काळ किंवा विलंबित अॅन्युईटी मिळण्याचे पर्याय.
चक्रवाढी दराने अॅन्युईटीचा लाभ मिळण्याचा पर्याय.
मोठ्या प्रीमियमसाठी@ जास्त अॅन्युईटी दराचा लाभ मिळवा.
अॅन्युईटी पेआउट्सची वारंवारिता निवडण्याचा पर्याय - मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक.
केवळ विशिष्ट अॅन्युईटी पर्यायांमध्येच खरेदीच्या किंमतीच्या किंवा खरेदीच्या किंमतीच्या शिल्लकीच्या परताव्याचा पर्याय उपलब्ध आहे.
@तपशीलांसाठी ‘उच्च खरेदी मूल्यासाठी उत्तेजना’ हा विभाग पहा.
हे प्रॉडक्ट ऑनलाइन सेल्ससाठी उपलब्ध आहे.
फायदे
सुरक्षा
तुमची सेवानिवृत्ती आनंदात जाण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य
विश्वसनीयता
तुमच्या खर्चांची पूर्तता करण्यासाठी नियमित उत्पन्न
लवचिकता
आकस्मिक काही घडले असता कुटुंबातील एका सदस्यासाठी ॲन्युइटी/ पेन्शन सुरक्षित करा
तुमच्या पसंतीनुसार नियतकालिक उत्पन्न मिळवा
कर लाभांचा आनंद घ्या*
ह्या प्रॉडक्टमध्ये दोन प्रकारच्या अॅन्युईटी उपलब्ध आहेत.
लाइफ अॅन्युईटी (सिंगल लाइफ):
लाइफ अॅन्युईटी (पर्याय 1.1): अॅन्युईटंटच्या जीवनासाठी सातत्यपूर्ण दराने अॅन्युईटी देय आहे आणि निधनानंतर तात्काळ संपुष्टात येते आणि काँट्रॅक्ट खंडित होते.
लाइफ अॅन्युईटी विथ रीटर्न ऑफ परचेस प्राइस** (पर्याय 1.2): अॅन्युईटंटच्या जीवनभर सातत्यपूर्ण दराने अॅन्युईटी देय, जी निधनानंतर संपुष्टात येते आणि नामनिर्देशित व्यक्तीला खरेदीची किंमत परत केली जाते व काँट्रक्ट खंडित होते.
लाइफ अॅन्युईटी विथ रीटर्न ऑफ बॅलन्स परचेस प्राइस# (पर्याय 1.3): अॅन्युईटंटच्या जीवनभर सातत्यपूर्ण दराने अॅन्युईटी देय. निधनानंतर, खरेदीच्या किंमतीची शिल्लक# (जी खरेदीची किंमत वजा अॅन्युईटंटला अगोदरच काही अॅन्युईटी पेमेंट्स मिळाली असल्यास त्यांची एकूण रक्कम) दिली जाईल. हा बॅलन्स जर पॉझिटिव नसेल तर कोणताही डेथ बेनिफिट देय नाही, सर्व भावी अॅन्युईटी पेआट्स तात्काळ संपुष्टात येतात आणि पॉलिसी खंडित होते.
लाइफ अॅन्युईटी विथ अॅन्युअल सिंपल इन्क्रीज ऑफ 3% (पर्याय 1.4) किंवा 5% (पर्याय 1.5) : अॅन्युईटंटच्या जीवनभर वाढती अॅन्युईटी देय आहे, जी निवडलेल्या पयार्याच्या अनुसार, पॉलिसीच्या प्रत्येक पूर्ण वर्षी प्रति वर्ष 3% किंवा 5% सरळ व्याजदराने वाढत जाते. अॅन्युईटंटच्या निधनानंतर, सर्व भावी पेआउट्स तात्काळ संपुष्टात येतात आणि काँट्रॅक्ट खंडित होते.
लाइफ अॅन्युईटी विथ सर्टन पीरियड ऑफ 10 वर्षे (पर्याय 1.6) किंवा 20 वर्षे (पर्याय 1.7): कार्यान्वित पर्यायाच्या अनुसार, 10 किंवा 20 वर्षांच्या ठरावीक कालावधीसाठी सातत्यपूर्ण दराने अॅन्युईटी देय असते; आणि त्यानंतर अॅन्युईटंटला जीवनभर तीच अॅन्युईटी रक्कम देय असते.
परिस्थिती 1 : ॲन्युईटंटचे जर 10 किंवा 20 वर्षांच्या पूर्व-सुनिश्चित कालावधीमध्ये निधन झाले, तर निवडलेल्या कालावधीच्या अखेरीपर्यंत नामनिर्देशित व्यक्तीला ॲन्युईटी पेआउट्स मिळत राहतील, त्यानंतर ॲन्युईटी पेआउट्स संपुष्टात येतील आणि कॉन्ट्रॅक्ट खंडित होईल.
परिस्थिती 2 : ॲन्युईटंटचे जर 10 किंवा 20 वर्षांच्या पूर्व-सुनिश्चित कालावधीनंतर निधन झाले, तर ॲन्युइटंटच्या निधनानंतर ॲन्युईटी पेआउट्स ताबडतोब संपुष्टात येतील आणि कॉन्ट्रॅक्ट खंडित होईल.
लाइफ अॅन्युईटी विथ अॅन्युअल कंपाउंड इन्क्रीज ऑफ 3% (पर्याय 1.8) किंवा 5% (पर्याय 1.9) : अॅन्युईटंटच्या जीवनभर वाढती अॅन्युईटी देय आहे, जी निवडलेल्या पर्यायाच्या अनुसार, पॉलिसीच्या प्रत्येक पूर्ण वर्षी प्रति वर्ष 3% किंवा 5% चक्रवाढ व्याजदराने वाढत जाते. अॅन्युईटंटच्या निधनानंतर, सर्व भावी पेआउट्स तात्काळ संपुष्टात येतात आणि काँट्रॅक्ट खंडित होते.
डिफर्ड लाइफ अॅन्युईटी विथ रीटर्न ऑफ परचेस प्राइस** (पर्याय 1.10) :
i)डिफरमेंट कालावधीच्या अखेरीनंतर अॅन्युईटंटच्या जीवनभर ॲन्युईटी सातत्यपूर्ण दराने देय असते.
ii)डिफरमेंट कालावधीच्या दरम्यान अॅन्युईटंटचे निधन झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला देय असलेला डेथ बेनिफिट खालीलपैकी जास्त असणारी रक्कम असेल :
क. खरेदीच्या किंमतीच्या 100% अधिक (+) निधनाच्या तारखेपर्यंत संचयित गॅरंटीड अॅडिशन्स.
ख. खरेदीच्या किंमतीच्या 105%. आणि सर्व भावी लाभ/अॅन्युईटी पेमेंट्स ताबडतोब संपुष्टात येतील आणि काँट्रॅक्ट खंडित होईल.
iii)डिफरमेंट कालावधीच्या नंतर अॅन्युईटंटचे निधन झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला देय असलेला डेथ बेनिफिट खालीलपैकी जास्त असणारी रक्कम असेल:
क. खरेदीच्या किंमतीच्या 100% अधिक (+) डिफरमेंट कालावधीच्या दरम्यान संचयित गॅरंटीड अॅडिशन्स वजा (-) अॅन्युईटंटच्या निधनाच्या तारखेपर्यंत भरलेली एकूण अॅन्युईटी.
ख. खरेदीच्या किंमतीच्या 100%. आणि सर्व भावी लाभ/अॅन्युईटी पेमेंट्स ताबडतोब संपुष्टात येतील आणि काँट्रॅक्ट खंडित होईल.
iv) जिथे गॅरंटीड अॅडिशन प्रति महिना = पॉलिसी वर्षामध्ये देय असलेली एकूण अॅन्युईटी/12.
v)डिफरमेंट कालावधीच्या दरम्यान पॉलिसीच्या प्रत्येक महिन्याच्या अखेरीस संचयित गॅरंटीड अॅडिशन्स.
2. जॉइंट लाइफ अॅन्युईटी (टू लाइफ) :
लाइफ अँड लास्ट सर्व्हायवर 100% अॅन्युईटी (पर्याय 2.1) :प्राथमिक अॅन्युईटंट जिवंत असेपर्यंत सातत्यपूर्ण दराने अॅन्युईटी देय आहे. प्राथमिक अॅन्युईटंटच्या निधनानंतर, हयात असणाऱ्या दुसऱ्या अॅन्युईटंटला शेवटच्या अॅन्युईटी पेआउटच्या 100% प्रमाणे मिळत राहील. शेवटच्या हयात व्यक्तीच्या निधनानंतर, अॅन्युईटी पेआउट्स ताबडतोब संपुष्टात येतील आणि काँट्रॅक्ट खंडित होईल. दुय्यम अॅन्युईटंटचे निधन जर प्राथमिक अॅन्युईटंटच्या आधी झाले, तर प्राथमिक अॅन्युईटंटच्या निधनानंतर काहीही देय नसेल आणि काँट्रॅक्ट खंडित होईल.
लाइफ अँड लास्ट सर्व्हायवर 100% अॅन्युईटी विथ रीटर्न ऑफ परचेस प्राइस** (पर्याय 2.2) : प्राथमिक अॅन्युईटंट जिवंत असेपर्यंत सातत्यपूर्ण दराने अॅन्युईटी देय आहे. प्राथमिक अॅन्युईटंटच्या निधनानंतर, हयात असणाऱ्या दुसऱ्या अॅन्युईटंटला शेवटच्या अॅन्युईटी पेआउटच्या 100% मिळत राहील. शेवटच्या हयात व्यक्तीच्या निधनानंतर, अॅन्युईटी पेआउट्स ताबडतोब संपुष्टात येतील आणि काँट्रॅक्ट खंडित होईल.
डिफर्ड लाइफ अँड लास्ट सर्व्हायवर अॅन्युईटी विथ रीटर्न ऑफ परचेस प्राइस** (पर्याय 2.3):
i)डिफरमेंट कालावधीच्या अखेरीनंतर प्राथमिक अॅन्युईटंट जिवंत असेपर्यंत अॅन्युईटी सातत्यपूर्ण दराने देय असते.
ii)प्राथमिक अॅन्युईटंटच्या निधनानंतर, दुसऱ्या अॅन्युईटंटला (त्यावेळी हयात असल्यास) लाइफ अॅन्युईटी मिळेल, जी निवड केली असेल त्यानुसार, प्राथमिक अॅन्युईटंटला दिलेल्या शेवटच्या अॅन्युईटी रकमेच्या 100% असेल. दुसऱ्या अॅन्युईटंटचे निधन जर प्राथमिक अॅन्युईटंटच्या आधी झाले, तर प्राथमिक अॅन्युईटंटच्या निधनानंतर अॅन्युईटी पेमेंट्स संपुष्टात येतील.
iii)डिफरमेंट कालावधीच्या दरम्यान शेवटच्या हयात व्यक्तीचे निधन झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला देय असलेला डेथ बेनिफिट खालीलपैकी जास्त असणारी रक्कम असेल :
क. खरेदीच्या किंमतीच्या 100% अधिक (+) निधनाच्या तारखेपर्यंत संचयित गॅरंटीड अॅडिशन्स.
ख. खरेदीच्या किंमतीच्या 105%. आणि सर्व भावी लाभ/अॅन्युईटी पेमेंट्स ताबडतोब संपुष्टात येतील आणि काँट्रॅक्ट खंडित होईल.
iv)डिफरमेंट कालावधी संपल्यानंतर शेवटच्या हयात व्यक्तीचे निधन झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला देय असलेला डेथ बेनिफिट खालीलपैकी जास्त असणारी रक्कम असेल :
क. खरेदीच्या किंमतीच्या 100% अधिक (+) डिफरमेंट कालावधीच्या दरम्यान संचयित गॅरंटीड अॅडिशन्स वजा (-) शेवटच्या हयात व्यक्तीच्या निधनाच्या तारखेपर्यंत भरलेली एकूण अॅन्युईटी.
ख. खरेदीच्या किंमतीच्या 100%. आणि सर्व भावी लाभ/अॅन्युईटी पेमेंट्स ताबडतोब संपुष्टात येतील आणि काँट्रॅक्ट खंडित होईल.
v)जिथे गॅरंटीड अॅडिशन प्रति महिना = पॉलिसी वर्षामध्ये देय असलेली एकूण अॅन्युईटी/12.
vi)डिफरमेंट कालावधीच्या दरम्यान पॉलिसीच्या प्रत्येक महिन्याच्या अखेरीस संचयित गॅरंटीड अॅडिशन्स.
**खरेदीची किंमत ह्याचा अर्थ पॉलिसीमधील प्रीमियम (लागू कर, असल्यास अन्य काही लेव्हीज् वगळून) असा राहील.
#बॅलन्स खरेदीची किंमत = प्रीमियम (लागू कर, असल्यास अन्य काही लेव्हीज् वगळून) वजा संबंधित तारखेपर्यंत केलेले अॅन्युईटी पेआउट्स. ही रक्कम उणे असल्यास, कोणताही डेथ बेनिफिट देय नसेल. विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.
एसबीआय लाइफ - स्मार्ट अॅन्युईटी प्लसच्या जोखमीच्या घटकांचे अधिक तपशील, अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा
*खरेदी जिथे विद्यमान PFRDA मार्गदर्शन प्रणालीच्या अनुसार NPSच्या रकमेतून केलेली असेल तिथे नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS) सबस्क्रायबर्सच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रवेशाचे वय कमी किंवा जास्त करण्याला अनुमती दिली जाईल.
कृपया दखल घ्या : जिथे रकमा कंपनीद्वारे जारी करण्यात आलेल्या किंवा प्रशासित काँट्रक्टमधील किंवा सुपरअॅन्युएशन स्कीम्सच्या बाबतीत मालक-कर्मचारी प्रकरणातून आलेल्या आहेत, जिथे अॅन्युईटीची खरेदी सक्तीची असेल किंवा सरकारी योजना, कर्मचारी किंवा लाभार्थींना सामावून घेणाऱ्या विशेष स्थितींमध्येच 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे अॅन्युईटंट्स स्वीकारले जातील.
जॉइंट लाइफ अॅन्युईटीजसाठी वरील सर्व प्रसंगी वयाची मर्यादा दोघांच्या जीवनाला लागू होती. जॉइंट लाइफ अॅन्युईटीजच्या बाबतीत, प्राथमिक आणि दुय्यम जीवनांमधील वयांच्यातील फरक कमाल 30 वर्षे असण्याला अनुमती आहे.
2W/ver1/01/25/WEB/MAR
विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.
*कर लाभ :
कर लाभ हे प्राप्तिकर कायद्याच्या अनुसार आहेत आणि ते वेळोवेळी बदलणे सापेक्ष आहे. तपशिलांसाठी तुमच्या कर सल्लागाराबरोबर सल्ला मसलत करा.
तुम्ही/सदस्य भारतातील कर कायद्याच्या अनुसार प्राप्तिकरातील लाभ/सवलतींसाठी पात्र आहात, जे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा. तपशीलांसाठी कृपया तुमच्या टॅक्स ॲडवायझरचा सल्ला घ्या.
अॅन्युईटी बेनिफिट्स हे आणि अॅन्युईटंटने निवडलेले अॅन्युईटी पर्याय आणि अॅन्युईटी भरण्याची पद्धत ह्यावर अवलंबून असतील आणि अॅन्युईटीच्या खरेदीच्या वेळी असलेले प्रचलित अॅन्युईटी दर, ॲन्युईटंट्सद्वारे चुकते केले जातील.